औरंगाबाद - शहरातील
नारेगाव भागातील भंगार गोदामाला सोमवारी सायंकाळी आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन
दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत जीवित हानीची
माहिती अद्याप समोर आली नसून गोदामातील भंगार मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी
सांगितले.
अग्निशमन दलाचे जवान आग
विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. भंगार गोदामाला ही आग लागली असल्याने काही
स्फोटक पदार्थ त्यात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने अग्निशमन दलाचे जवान
काळजी घेत आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
दोन वर्षांपूर्वी दिवाळीच्या
दिवसांतच लागली होती आग
दोनवर्षांपूर्वी दिवाळीच्या
दिवसांमध्येच औरंगपूरा येथील फटाका मार्केटला आग लागली होती. या आगीचे लोळ एवढे
मोठे होते की जालना रोडवरील इमारतींवरुनही आगीचे लोळ दिसत होते.












